ग्वाल्हेर :- दुसऱ्या सामन्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला हाॅकी संघाने इंदोर विद्यापीठाचा ३ : ० ने पराभव करीत आगेकूच केली आहे
सामन्याच्या पहिल्या क्वार्टर मधे तिसऱ्या मिनिटाला निर्जला शिंदे ने पहिला गोल केला तर तिसऱ्या क्वार्टर मधे सहाव्या मिनिटाला प्रियांका वाहुळ ने गोल करून आघाडी वाढवली
तरचौथ्या क्वार्टर मधे सहाव्या मिनिटाला भाग्यश्री शिंदे ने तिसरा गोल करून विजय निश्चित केला. संघाच्या गोलरक्षक अचल क्षीरसागरची सामन्यातील कामगिरी लक्षवेधी उत्कृष्ट गोलरक्षण केलेया तिने प्रतिस्पधी इंदोर विद्यापीठाचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पडला त्यामुळे या टीमला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. या विजयाबद्दल विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ रंजन बडवणे यांनी संघाचे अभिनंदन केले आहे