आज आयपीएल मध्ये दोन सामने होते तर यामध्ये दुसऱ्या सामन्यांमध्ये राजस्थान समोर चेन्नईचे आव्हान होते.यामध्ये यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे धडाकेबाज खेळीच्या बळावर विशाल असे 189 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पार केले. यशस्वी जयस्वाल यांनी मात्र 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. शिवम दुबे ही वेगवान अर्धशतक ठोकून त्याला चांगली साथ दिली.या दोघांच्या चांगल्या कामगिरीमुळे ऋतुराज गायकवाड चे शतक व्यर्थ झाले आहे. उद्या पुन्हा आयपीएल मध्ये दोन सामने आहे.
पहिल्या सामन्यांमध्ये बेंगलोर समोर पंजाबचे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये कोलकाता समोर हैदराबादचे आव्हान असणार आहे.नाणेफेक जिंकून राजस्थानी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
चेन्नईचे सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.चांगल्या फॉर्मात असलेल्या ऋतुराज या सामन्यामध्ये आपला फॉर्म कायम ठेवत आयपीएल मध्ये या वर्षाचे पहिले शतक ठोकले. त्याने 101 धावा केल्या. राजस्थान कडून गोलंदाजीमध्ये राहुल तेवटीयाणे तीन गडी बाद केले.
विशाल असे 190 धावांचा पाठलाग करीत असताना राजस्थानच्या सलामीवीरांनी संघाला जोरदार सलामी करून दिली.सलामीवीर यशस्वी जयस्वाल या वर्षाचे सर्वात जलद अर्धशतक ठोकले. तसेच शिवम दुबे नेही अर्धशतक ठोकले. चेन्नई कडून ठाकुर ने दोन तर आसिफने एक गडी बाद केला.