आज आयपीएल मध्ये दोन सामने आहे तर पहिल्या सामन्यांमध्ये मुंबईसमोर दिल्लीचे आव्हान होते. या सामन्यांमध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाकडून एक बदल करण्यात आला. दिल्लीच्या माजी कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेल्या संयमी खेळीच्या बळावर दिल्लीने विजय मिळविला आहे. कमी धावांचा हवामान असतानाही दिल्लीची चांगलीच दमछाक झाली.
या पराभवामुळे मुंबई इंडियन्स आता प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात दिसत आहे.तर आज दुसऱ्या सामन्यांमध्ये राज्यस्थान समोर चेन्नईचे आव्हान असणार आहे, यामध्ये राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरविला.मुंबईकडून कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला.
त्यामुळे मुंबई फक्त 129 धावा पर्यंत मजल मारू शकला. फक्त सूर्यकुमार यादव वीस च्या पुढे गेला त्याने तेथील धावा केल्या. चक्क आठ फलंदाज 20 धावा च्या आत बाद झाले. दिल्लीकडून आवेश खाने मुंबईचे तीन गडी घेऊन कंबरडे मोडले. अक्षर पटेल नेही तीन गडी बाद करून त्याला मोलाची साथ दिली. धावांचा पाठलाग करीत असताना दिल्लीची ही सुरुवात चांगली राहिली नाही.
फक्त 30 धावा वर त्याचें आघाडीयाचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर मात्र कर्णधार रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. तसेच शेवटी अश्विन च्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला. तर मुंबईकडून पोलाड वगळता सर्व गोलंदाजांनी एक एक गडी बाद केला. महत्वाचे तीन बळी घेणारा स्पिन गोलंदाजी अक्षर पटेल सामनावीर ठरला.