राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ उपांत्यफेरीत दाखल,

कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हिमाचलप्रदेश कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, 19व्या फेडरेशन कप  राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद वरिष्ठ गटांच्या स्पर्धेचे आयोजन येत्या दिनांक 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर ते २०२१ तारखेदरम्यान कुलु, हिमाचालप्रदेश, येथे करण्यात आले. स्पर्धेत एकूण दहा संघांचा समावेश आहे.

प्रदीर्घ कालखंडानंतर होत असलेल्या 19व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कॉर्फबॉल स्पर्धेत आज सकाळच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्र राज्याच्या संघाने अनुक्रमे अ-गटातून, पहिल्या सामन्यात हिमाचालप्रदेशचा 7 विरुद्ध 1 गोलने, दुसऱ्या सामन्यात तेलंगणाचा 11 विरुद्ध 8 गोलने, आणि तिसऱ्या सामन्यात केरळ राज्याचा 9 विरुद्ध 8 गोलने पराभव करीत स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला,

उपांत्यफेरीचा सामना उद्या सकाळच्या सत्रात होणार आहे,

महाराष्ट्र राज्याच्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर यश प्राप्त केले असून, संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू विपूल कड, श्रेयस शेवते, दिशान गांधी, प्रणव खोमणे, श्रीप्रसाद पांढरे, संदेश पवार, रुणाल मालुसरे, तुषार वाळुंजे, कर्णधार पूजा पांढरे, सिद्धी सेठी, भूमी कपूर, गौरी पाटील, निशा पांडिया, शरयू जगताप, दृष्टी चव्हाण, दीप्ती पखाले यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत संघास घवघवीत यश मिळवून दिले, तर संघास प्रा. गौतम जाधव व अतुल खोमने यांचे मार्गदर्शन लाभले.

You might also like

Comments are closed.