• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, August 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे आमरण उपोषण; चार दिवसांपासून आंदोलन कायम

by pravin
July 27, 2026
in अन्य खेळ, नोकरी भरती
Reading Time: 1 min read
भरतीच्या मागणीसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांचे चौथ्या दिवशीही आमरण उपोषण; शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन कायम
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे | प्रतिनिधी

राज्यातील प्रलंबित शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली २४ जुलै २०२६ पासून पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही कायम आहे. राज्यभरातील बी.पी.एड., एम.पी.एड पात्र शारीरिक शिक्षण शिक्षक चार दिवसांपासून आंदोलनस्थळी ठिय्या मांडून शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

महासंघाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होत असून, क्रीडा क्षेत्रासाठी सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही मोठा फटका बसत आहे. दुसरीकडे, आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करूनही हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

यापूर्वी महासंघाच्या वतीने २७ एप्रिल आणि ८ जुलै २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी शासनाने विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा प्रवेश नियमावली जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने महासंघाने अखेर २४ जुलैपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असून, शासनाकडून लेखी स्वरूपात सकारात्मक निर्णय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे महासंघाने स्पष्ट केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शारीरिक शिक्षण शिक्षक, प्रशिक्षक आणि पदाधिकारी पुण्यात दाखल होत असून आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे.

प्रमुख मागण्या

  • विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा अटी तातडीने प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करावी.
  • शारीरिक शिक्षण शिक्षकांची रिक्त पदे इतर विषय शिक्षकांच्या समायोजनातून न भरता स्वतंत्र भरतीद्वारे भरावीत.
  • जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आश्रमशाळा, समाजकल्याण विभाग तसेच इतर शासकीय शाळांतील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत.

महासंघाने शासनाला इशारा दिला आहे की, शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीबाबत ठोस निर्णय जाहीर होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही. राज्यातील पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांनीही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

Tags: Education NewsMaharashtra Education NewsMaharashtra NewsMaharashtra Teacher ProtestPavitra Portal 2025Physical Education TeacherPune Education Commissioner OfficePune NewsSpecial Teacher SportsSports Education Maharashtrasports news marathiSports PanoramaSports Panorama MarathiSports Teacher Recruitmentआमरण उपोषणपवित्र पोर्टल 2025महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघमहाराष्ट्र शिक्षक भरतीविशेष शिक्षक क्रीडाशारीरिक शिक्षण शिक्षकशारीरिक शिक्षण शिक्षक भरतीशिक्षक आंदोलनशिक्षक भरती 2026शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे
ShareTweetSend
Next Post
राज्यस्तरीय वरिष्ठ नेटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा उपविजेतेपदावर शानदार झेंडा

राज्यस्तरीय वरिष्ठ नेटबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा उपविजेतेपदावर शानदार झेंडा

ताज्या बातम्या

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

सात्विक-चिरागची जबरदस्त ‘कमबॅक’ एन्ट्री; मलेशियन जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत!

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

नेव्हिल डिसोझा मैदानावरून संघर्ष तीव्र; ‘हा लढा सुरू करावा लागेल’ – आदित्य ठाकरे

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

शालेय क्रीडा स्पर्धांच्या प्रश्नांकडे महापौर-मनपा आयुक्तांनी थेट लक्ष द्यावे; क्रीडा क्षेत्रातून मागणी

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

स्वातंत्र्यदिनी क्रीडा क्षेत्राला २५ कोटींची मोठी भेट; पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.