औरंगाबाद-हॉकी महाराष्ट्र च्या वतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात जूनियर बॉईज आणि सीनियर वुमन्स ह्या वयोगटासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे.जूनियर बॉईज ची निवड चाचणी 14 सप्टेंबरला होणार आहे तर सीनियर वूमन्स ची निवड चाचणी 17 सप्टेंबरला होईल. 1 जानेवारी 2002 नंतर जन्मलेले मुले हे 14 वर्षाखालील निवड चाचणी सहभागी होऊ शकतात. निवड चाचणी साठी येणाऱ्या खेळाडूंना हॉकी इंडियाचे रजिस्ट्रेशन आयडी असने बंधनकारक असून त्यांनी कोविड करिता आरटी – पीसीआर चा रिपोर्ट बरोबर ठेवणे आवश्यक आहे.
या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून पाच खेळाडू जूनियर बॉईज च्या गटात तर पाच खेळाडू वरिष्ठ मुलींच्या गटात निवड चाचणीतून पाठवण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत आपले नाव हॉकी इंडिया रजिस्ट्रेशन आयडी सोबत औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांच्याकडे 9011073283 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावीत.असे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.