• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

साई’मध्ये हॉकी, अॅथलेटिक्ससाठी दोन महिन्यांपासून प्रशिक्षकच नाही

by pravin
August 20, 2021
in ॲथलेटिक्स, बातम्या, हॉकी
साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांना हॉकी व अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन देतांना क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, अॅथलेटिक्सचे डॉ.फुलचंद सलामपुरे, शशिकला निळवंत, हॉकीचे शेख साजिद आणि डॉ.प्रदीप खांड्रे

साईचे संचालक वीरेंद्र भांडारकर यांना हॉकी व अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन देतांना क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, अॅथलेटिक्सचे डॉ.फुलचंद सलामपुरे, शशिकला निळवंत, हॉकीचे शेख साजिद आणि डॉ.प्रदीप खांड्रे

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद : नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे केंद्र भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे देण्यात आले. मात्र, दोन महिन्यांपासून येथे हॉकी आणि ॲथलेटिक्स या खेळांसाठी प्रशिक्षक नसल्याने ते उपलब्ध करून देण्याची मागणी हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अथलेटिक्सचे सहसचिव तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर तथा अन्य अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

औरंगाबाद स्थित साई केंद्रात नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सचे केंद्र देण्यात आले. येथे हॉकी, अथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, व्हेट लिफ्टिंग आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. गत दोन महिन्यांपूर्वी औरंगाबाद साई येथे कर्तव्यावर असलेल्या ॲथलेटिक्स आणि हॉकी या खेळाच्या प्रशिक्षकांची बदली करण्यात आली होती. मात्र त्यांच्या जागेवर नव्या प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

दोन्ही खेळांच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या सुमारे दोन डजन खेळाडूंना कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय सध्या सराव करावा लागतो आहे. हा विषय त्यांच्या कारकिर्दीला बाधक ठरू शकणारा असल्याने, या रिक्त जागांवर त्वरित प्रशिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अॅथलेटिक्सचे सहसचिव तथा क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी पत्राद्वारे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.

पत्राची प्रत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, साईचे महासंचालक, औरंगाबाद स्थित संचालक विरेंद्र भांडारकर यांना या पत्राची प्रत देण्यात आली आहे. यावेळी औरंगाबाद अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. फुलचंद सलामपुरे व उपाध्यक्ष शशिकला निळवंत तसेच औरंगाबाद हॉकी संघटनेचे शेख साजिद आणि डॉ. प्रदीप खांड्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ShareTweetSend
Next Post

क्रीडा सहसंचालकपदी पदउन्नती झाल्या बदल चंद्रकांत कांबळे यांचा सत्कार समारंभ

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.