चेन्नई समोर पंजाब चे आवाहनआहे या सामन्यांमध्ये पंजाबच्या कर्णधार के एल राहुलच्या वादळात चेन्नई सुपर किंग्स चा सहा विकेट्सनी धूवा ऊडाला आहे. मात्र 42 चेंडूत 7 चौकार व आठ षटकारांच्या मदतीने नाबाद 98 धावा करणारा राहुल सामनावीर ठरला.
या विजयामुळे पंजाब चे प्ले ऑफ मध्ये पोचण्याचे आशा कायम आहे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये कोलकता समोर राजस्थानचे आव्हान असणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरविला. फाफ डु प्लेसिस वगळता चेन्नईच्या कोणताही फलंदाज साजेशी प्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही.
यामुळे चेन्नई फक्त 134 धावा करु शकला. चेन्नई कडून फाफ डु प्लेसिस ने सर्वाधिक 76 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये जॉर्डन व अर्षदीप सिंग ने प्रत्येकी दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना पंजाब ची सुरुवात चांगली राहिली. कर्णधार राहुल ने चेन्नईच्या गोलंदाजाचा चांगला समाचार घेत धू धू काढले.
यामुळे पंजाब ने चेन्नईला सहा विकेट्स 42 चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला आहे.तर चेन्नई कडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक तीन गडी बाद केले.