• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राहुल द्रविडने सोडले मौन,म्हणाला मी दु:खी नाही;

by pravin
February 21, 2022
in क्रिकेट
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई – श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यानंतर, माध्यमांसमोर साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत झालेले संभाषण समोर आणले. साहाने एका पत्रकाराने सोशल मीडियावर दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केल्याने वाद आणखी वाढला. वृद्धिमान साहाने रविवारी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला निवृत्ती पत्करण्याचे संकेत दिले, असा आरोप साहाने केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीनंतर दादाने (सौरव गांगुली) मला मेसेज केला आणि माझ्या खेळीसाठी अभिनंदन केले. त्याने माझा आत्मविश्वास वाढवला. गांगुलीने माझे कौतुक करतानाच तो ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष असेपर्यंत संघातील स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. पण त्यानंतर एका महिन्यातच चित्र पालटले,” असे साहाने मुलाखतीत सांगितले होते. त्याचवेळी राहुल द्रविडबद्दल बोलताना, मला संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते की आता माझ्या नावाचा विचार केला जाणार नाही. राहुल द्रविडनेही मी निवृत्तीचा विचार करावा,” असा सल्ला दिला होता, असे साहाने म्हटले.

राहुल द्रविडने दिले उत्तर

 

या संपूर्ण प्रकरणावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत उत्तर दिले. साहासोबतचे संभाषण समोर आल्यानंतर तुम्ही दु:खी आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना द्रविडने याबाबत भाष्य केले. “मी अजिबात दु:खी नाही. साहाने भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्याच्याबद्दल आदर होता म्हणून मी त्याच्याशी बोललो होतो. प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिका हा त्याचा हक्क आहे. त्याने माध्यमांकडून हे ऐकावे अशी माझी इच्छा नव्हती. मी नेहमीच खेळाडूंशी संवाद साधतो. मी जे काही बोलतो ते त्याला आवडेल आणि तो सहमत असेल असे नेहमीच होत नाही,” असे राहुल द्रविडने म्हटले.

 

 

Tags: HappyRahul DravidSpeak
ShareTweetSend
Next Post

पवन सेहरावतने बेंगळुरू बुल्सला उपांत्य फेरीत नेले;

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.