प्रो कबड्डी लीग २०२१ चा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या सहाव्या आठवड्यात गुरुवार रोजी (२७ जानेवारी) एकमेव झाला. टॉप-५ मध्ये जाण्यासाठी झगडत असलेले यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण हे संघ या सामन्यात आमने-सामने होते.
पहिल्या हाफपर्यंत पुणेरी पलटणने यूपी योद्धांवर २१-१८ ने आघाडी घेतली होती. हीच आघाडी पुढे कायम ठेवत पुणेरी पलटणने हंगामातील सातवा विजय नोंदवला आहे. ४४-३८ च्या फरकाने त्यांनी हा सामना जिंकला आहे.
Aaj @PuneriPaltan ka ek hi maqsad tha – badla 😉
Anup and Co. have the last laugh after a thumping victory against @UpYoddha💥#UPvPUN #VIVOProKabaddi #SuperhitPanga pic.twitter.com/asqw1owycF
— ProKabaddi (@ProKabaddi) January 27, 2022
गुणतालिकेत यूपी आणि पुणे टॉप-५ च्याही खाली
या सामन्यापूर्वी यूपी योद्धांचा संघ १३ पैकी ५ सामने जिंकत गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता. त्यांच्या खात्यात ३९ गुण होते. तर पुणेरी पलटण १३ पैकी ६ सामने जिंकूनही ३२ गुणांसह गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होता.
सध्या गुणतालिकेत बेंगलुरू बुल्स आणि दबंग दिल्ली हे संघ आघाडीवर आहेत. बेंगलुरूने १५ पैकी ८ सामने जिंकत सर्वाधिक ४६ गुण कमावले आहेत. तर दिल्लीचा संघ १३ पैकी ७ सामने जिंकत ४३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.