जालना (नाजीम मणियार)- सध्या आपल्याकडे ऑलिम्पिक फेस्टिव्हल सुरू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये भालाफेक मध्ये भारतासाठी नीरज चोप्रा ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकला. देशाकरता केवळ एक सुवर्णपदक जिंकलो केवळ सात पदक आपण मिळवू शकलो. त्यातील दोन सिल्वर मेडल सोडले तर चारही ब्रॉंझ मेडल आहेत. जपानसारख्या छोट्याशा देशाने आत्तापर्यंत 58 मेडल मिळविले त्यात 27 हे फक्त गोल्ड मेडल आहेत. बरं तेही जाऊद्या, आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेने ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले आहे. 113 मेडलपैकी तब्बल 39 गोल्डमेडल आहेत.आपण हे स्वप्न कधी बघू शकणार? स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात आपण काहीच प्रगती करू शकलो नाही हे कुठल्या तोंडानं सांगायचं. झाल तर जालना जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर क्रीडाबाह्य कारणासाठी केला जात आहे. संकुलाच्या दिवसेंदिवस दयनीय अवस्थेत वाढ होत आहे. मात्र राज्य सरकार व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. संकुलावर जवळपास दररोज पाचशे ते हजार खेळाडू सरावासाठी येतात. पण खेळापेक्षा दुसरेच उद्योग करण्यासाठी संकुलाचा वापर होत आहे. पत्त्यावर जुगार खेळणाऱ्यांसाठी व तळीरामांसाठी संकुल सुरक्षित ठिकाण बनले असून नियमित साफसफाई व डागडुजीअभावी संकुलाची दुरवस्था झाली आहे.तसेच रात्रीच्या वेळी पथदिव्यांची सुविधा देखील नाही आहे. क्रीडा नावाची गोष्टच उरली नसून संकुल मवाल्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनले आहे.जुगार खेळणे,दारू पिणे आणि धूम्रपान करण्यासाठी देखील संकुलाचा वापर केला जात आहे.
शहराच्या खेळाडूंसाठी हे एक मात्र मैदान असल्यामुळे मैदान सुसज्ज असणे आवश्यक आहे. येथे अनेक राष्ट्रीय,राज्य,विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.पण क्रीडा संकुलात प्रसाधनगृहाची दयनीय अवस्था झालेली आहे,खेळाडूंना राहण्याकरता असलेल्या खोल्यांच्या दरवाज्यांची ही दयनीय अवस्था झाली आहे.स्वच्छालय अनेक दिवसांपासून बंद पडलेले आहे. खेळाडूंना चेंजिंग रूम म्हणून बाथरूमचा वापर करावा लागतो यात कुठल्याही प्रकारची साफसफाई केली जात नाही.खेळाडूंना पिण्यासाठी स्वच्छ पाणी भेटत नाही. तर इथल्या इमारती ही दयनीय झाल्या आहेत. तर खेळाडूंसाठी ह्या धोकेदायक ठरू शकतात. लेदर क्रिकेट साठी वापरली जाणारी सिमेंट विकेटची पण दयनीय अवस्था झाली आहे चहूबाजूची नेट तुटली आहे.
विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती संकुलाचे नाव नाही.तसेच प्रवेशद्वाराचे गेटच्या पिलर मोडकळीस आले आहे.रोज या ठिकाणी महिला सुद्धा सराव करता त्यांना सराव करतानां सुरक्षितता वाटत नाही .संकुलामध्ये यायचे असेल तर सोबत पालकांनाही घेऊन यावे लागते व त्यांना वेळ नसला तर त्या दिवशी सरावही होत नाही संकुलाच्या देखभाली करिता सुरक्षारक्षक नाही नुकतेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी तरुणांना आव्हान केले की तरुणांनी व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळावर जास्त लक्ष केंद्रित करावे या करता संकुलाचे वातावरण निर्मिती करता संकुलाची अवस्था चांगली करण्याची गरज आहे.
यासंदर्भात शहरासाठी फक्त एकच क्रीडासंकुल असून हे चांगले असणे आवश्यक आहे, तरी मात्र या स्टेडियमची अवस्था लवकरात लवकर बदलावी यासाठी राज्य क्रीडा मंत्री सुनील केदार,क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विभागीय उपसंचालक उर्मिला मोराळे,तसेच आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी यांनी लक्ष्य घालण्याची गरज भासत आहे. या ग्राउंडवर अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहे तरी या स्टेडियम ची दयनीय अवस्था झाली असताना सुद्धाही जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख याकडे लक्ष देत नाही आहे. लवकरात लवकर देखभाल दुरुस्ती करावी अशी आशा खेळाडू, प्रशिक्षक व सर्व क्रीडा संघटनांकडून व्यक्त होत आहे.