औरंगाबाद ( प्रविण वाघ ):-व्यायाम शाळांना क्रीडा साहित्य पुरवठ्यात गैरप्रकार केल्याचा आरोप असलेले औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची काही दिवसांपासून वरिष्टांकडून चौकशी करण्यात येत आहे .त्यांचा अहवाल क्रीडा आयुक्त व क्रीडा मंत्र्यांकडे सादर झाला असतांना दुसऱ्यांदा शुक्रवार दि ७ जानेवारी रोजी पासुन पुन्हा नावंदे यांची चौकशी सुरु झाली आहे.
यामध्ये व्यायामशाळा विकास याजना अंतर्गत खुले व्यायाम साहित्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल आहे का? तसेच बसवण्यात आलेले संपूर्ण खुले व्यायाम शाळा साहित्य आयएसओ (ISO) प्रमाणित साहित्य आहे का ?असेल तर मोडकळीस का येत आहे. असा मोठा प्रश्न नागरीका मध्ये निर्माण होत आहे . जिल्ह्यामध्ये बसवण्यात आलेले व्यायाम शाळा साहित्य हे कोणत्याही प्रकारचे आयएसओ प्रमाणित स्टिकर नसून साहित्या कोणत्या प्रकारचे आहे.
वार्ड क्र. १११ भारतनगर , शिवाजीनगर देवगिरी हिल्स मनपा औरंगाबाद येथील एकूण सात लाख रुपयांचे बसवण्यात आलेले खुले व्यायाम साहित्य हे मोडकळीस आले आहे . याठिकाणी शिवाजीनगर , भारतनगर ,आशानगर या ठिकाणांहून सकाळी व संध्याकाळी लहान मुले , महिला आणि ज्येष्ठ नागरिक व्यायाम करण्याकरता येत असतात एखाद्या वेळेस याठिकाणी ज्येष्ठ नागरिक व्यायाम करत असल्यास अचानक साहित्य तुटले असता शारीरिक गंभीर इजा होण्याची दाट शक्यता आहे व कोणते साहित्य कशाकरता व त्याचा कसा वापर करायचा याचे फलकही याठिकाणी लावण्यात आलेले नाही . यामुळेही शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने साहित्य लावतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे .
विभागीय चौकशी व प्राथमिक चौकशी न करण्याकरता थेट क्रीडा मंत्र्यांना विनवणी
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार बुधवारी त्यांनी क्रीडामंत्री केदार यांना पत्र पाठवून पुन्हा चौकशी न करण्याची विनंती केली आहे .क्रीडा विभागातील व काही बाह्य व्यक्ती हेतुपुरस्कर मला मानसिक त्रास देवून शासकीय कामकाजाच्या गतीमध्ये बाधा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. विभागीय चौकशी व प्राथमिक चौकशी न करण्याकरताची विनवणी क्रीडा मंत्री सुनील केदार यांना पत्राद्वारे बुधवार दि .४ रोजी करण्यात आली आहे .हे पत्र स्पोर्ट्स पॅनोरमाकडे उपलब्ध आहे .
पहिल्या चौकशी अहवाल विषयी ओम प्रकाश बकोरीया यांना विचारणा केली असता दोन्हीही चौकशीचे रिपोर्ट संकलित (COMPILE) एकत्र करून क्रीडा मंत्र्यांना सादर करण्यात येतील क्रीडा मंत्री यावर अंतिम निर्णय घेतील .