कोल्हापूर (प्रतिनिधी)-गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सोनल सावंत हिने ज्युनियर गटात एक सुवर्ण व सिनियर गटात एक सुवर्ण अशा दोन पदकांची कमाई करत यंदाचा ‘स्ट्राँग वुमेन ऑफ इंडिया ‘ हा बहुमान पटकावला. मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकर हिने ७६ किलो वजन गटात ज्युनियर, सिनियर इक्वीपड व अनइक्वीपड़ अशा प्रकारात तीन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले. ५८ किलो ज्युनियर वजन गटात शुभांगी पाटील (कळंबा) हिने कांस्यपदक पटकावले.
मुलांमध्ये ६६किलो सब-ज्युनियर गटात कुणाल वडणगेकर (बापट कॅम्प) याने कांस्यपदक पटकावले.हे खेळाडू कळंबा येथील लिफ्टर्स पॉईट जिम मध्ये सराव करतात. प्रशिक्षक विजय कांबळे, प्रा. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन व शाहू साखरचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहान लाभले.