जम्मू येथे सुरू असलेल्या 55व्या कनिष्ठ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स व पंचविसाव्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपदची कामगिरी केली. तर वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्यन दवंडे ने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट निशांत करंदीकर याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये महाराष्ट्राची रिया केळकर चौथ्या स्थानी तर अनुष्का पाटील पाचव्या स्थानी राहीली.
जम्मू येथील एम ए स्टेडियमवर सुरू असलेल्या जिम्नॅस्टिक या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स पाठवणी आपल्या नाव लौकिकाला साजेशी कामगिरी करत स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली महिलांचे सांघिक सुवर्णपदक केवळ 1. 00 एवढ्या गुणांनी हुकले. पश्चिम बंगाल संघाने महिलांमध्ये सांघीक विजेतेपद पटकावले. तर पुरुषांमध्ये उत्तर प्रदेश संघाने महाराष्ट्राला कडवी लढत देत सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे
पुरुष निशांत करंदीकर, सार्थक राऊल, आर्यन दवंडे, मेघा रॉय, सोहम ढोले, प्रशिक्षक शुभम गिरी, व्यवस्थापक अद्वैत वांगीकर.महिला सृष्टी भावसार, रिया केळकर, देवयानी कोलते, अनुष्का पाटील, हर्शिता काकडे, प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे,व्यवस्थापक केतकी गोखले .स्पर्धेचा रिझल्ट सोबत जोडत आहे.