जागतिक टेनिसमधील ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला टेनिस खेळाडू एश्ले बार्टीने एक मोठी घोषणा केली आहे. बार्टी जागतिक टेनिसमधील पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे. एश्ले बार्टीने तिचे लग्न ठरल्याची माहिती दिली आणि साखरपुड्याची अंगठी हातात घातलेला फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून ही माहिती दिली आहे. बार्टीने तिच्या होणार्या पतीसोबत साखरपूडा झाल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याच्यासोबतचा एख खास फोटो शेअर केला आहे.
एश्ले बार्टीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर एक खास पोस्ट करत लवरच ती लग्नबंधनात अडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. २५ वर्षीय बार्टी आता लवकरच तिच्या जवळच्या मित्रासोबत लग्न करणार आहे. तिच्या या जवळच्या मित्राचे नाव गॅरी किसीक आहे आणि मागच्या बऱ्याच काळापासून हे दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. तत्पूर्वी तिने इंस्ट्राग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसत आहे. फोटोत ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत दिसत असून, दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “भविष्यात होणारा पती”
डब्लयूटीए क्रमवारीत बार्टी सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा ती क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असताना वर्षाचा शेवट करेल. तिने या सत्रात विंबल्डनसह एकूण पाच स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला परतण्यापूर्वी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर आता ती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेची तयारी करत आहे. तिने पुढच्या सत्राच्या आधी स्वतःता ताजेतवाने केले आहे. याबाबत ती म्हणली आहे की, तीन महिन्यांचा ब्रेक तिच्यासाठी फायदेशीर राहीला.
https://www.instagram.com/p/CWnDVdFBDJ_/?utm_source=ig_web_button_share_sheet
तत्पूर्वी विंबल्डन टेनिस स्पर्धेनंतर बार्टीने टीकाकारांना तिच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ती यावेळी म्हणाली होती की, “अनेक लोक मी क्रमांक एकची खेळाडू असन्याबाबत शंका उपस्थित करत आहेत, अशात मला स्वतःला सिद्ध करायचे होते आणि विंबल्डनमधील विजयाने मी ते करून दाखवले.”