औरंगाबाद(प्रतिनिधी): चंदीगड राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन द्वारा यांच्या सहकार्याने आयोजित
पंजाब युनिव्हर्सिटी येथे 40 व्या ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र च्या मुली संघाला तृतीय पदकावर समाधान मानावे लागले. या राष्ट्रीय स्पर्धेत मुलीच्या गटात मध्यप्रदेश(प्रथम)राजस्थान (द्वितीय) महाराष्ट्र (तृतीय) तर मुलांच्या गटात राजस्थान (प्रथम)छत्तीसगड(द्वितीय) पंजाब(तृतीय)स्थानावर राहिले.
आज झालेल्या मुलींच्या 5 इनिंग च्या सामन्या मध्ये महाराष्ट्र संघाने केरळ या संघाला 5-3 होमरन च्या फरकाने हरविले. मुलींमध्ये साक्षी येटाळे हिने उत्कृष्ठ हीटिंग केली तसेच अंजली पवार, विनिता पाटील, ऐश्वर्या होणाकोरे, सानिका कांबळे, यांनीही विजयाचा मोलाचा वाटा उचलला.
मुलींचा संघ पुढीलप्रमाणे
सानिका कांबळे,वैष्णवी निकम,अंजली पवार,सप्तश्री येवतिकर,साक्षी येटाळे, श्रावणी चौघुले,अनुष्का पंगेवाड,नंदिनी ढोरमारे, पलक बजाज, विनिता पाटील,दिव्या झोपे, गार्गी उगले,हेमलता बागडे, अक्षदा तायडे,ऐश्वर्या होणाकोरे, समृद्धी सूर्यवंशी ह्या खेळाडूनचा समावेश होता.
महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक किशोर चौधरी, अक्षय येवले,गणेश बेटूदे, प्रज्वल जाधव व व्यवस्थापक उर्वशी सनेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले . राष्ट्रीय प्रशिक्षक अक्षय येवले (जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सहाव्यादा महाराष्ट्र संघाला पदक प्राप्त झाले ते स्वतः एक आंतरराष्ट्रीय पदक पप्राप्त खेळाडू असून त्यांनी अनेकदा महाराष्ट्र संघांचे प्रशिक्षक म्हणून कार्य केले.
मुलीच्या संघाने तृतीय पदक प्राप्त केल्याबद्दल भारतीय सॉफ्टबॉल महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणजी अनावकर,महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल चे सचिव प्रदीप तळवेलकर, औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथरीकर, उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर,संतोष आवचार,सागर रुपवते,अक्षय बिरादार यांनी अभिनंदन केले.