नॅशनल गेम्स २०२२: पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा

पुणे (प्रतिनिधी):  महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाने पदार्पणातच गुजरात येथील ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये पदकाचा मानकरी हाेण्याचा दावा केला आहे. यासाठी महाराष्ट्राचे आठ खेळाडू सध्या पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव करत आहेत. यामध्ये राष्ट्रीय खेळाडू विशाल जाधवसह राहुल उगलमुगलेचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्र संघाचा पदकाचा दावा मजबुत झाला आहे. या खेळाडूंना सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष माननीय  सुनील पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

साॅफ्ट टेनिस हा एशियन गेम आहे. यंदा पहिल्यांदाच या खेळाचा नॅशनल गेम्समध्ये समावेश करण्यात आला आहे. यातून महाराष्ट्र संघालाही या स्पर्धेत सहभागी हाेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचे युवा खेळाडू सध्या या खेळात उल्लेखनीय कामगिरीमुळे फाॅर्मात आहेत.

नॅशनल गेम्स २०२२: पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा

या स्पर्धेच्या तयारीसाठी पुण्यात खास प्रशिक्षण आणि सराव शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यासाठी आठ पुरुष आणि दाेन महिला खेळाडूंचा समावेश करण्यात आला. यातून आता पाच पुरुष आणि एका महिला खेळाडूची नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र संघात निवड हाेणार आहे, अशी माहिती सुनील पुर्णपात्रे यांनी दिली.

 

You might also like

Comments are closed.