छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- सायकलिंग असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्हा, न्यू हनुमान सामाजिक सेवाभावी व्यायाम क्रीडा मंडळ, प्रायोजक साई पूजा स्पोर्ट्स आयोजित मराठवाड्यातील पहिलीच 30 किलोमीटर ओपन मास्टर्स सायक्लोथाॅन स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग येथे प्रचंड उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, सातारा, नगर येथील 90 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रायडर्सनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव दीपक जाधव व भिकन अंबे, डॉ. विजय व्यव्हारे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सदस्य राधिका अंबे, गणेश बनसोडे, पंकज बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे सूत्रसंचालन सायकलींगची राष्ट्रीय खेळाडू पूजा आंबे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक भूमकर, विकास घोगरे, हेमराज पखाले, साई अंबे, प्रथमेश भुमकर यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेतील विजेते सायकलिस्ट गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर सायक्लोथाॅन स्पर्धेसाठी पात्र ठरले.
ओपन मास्टर्स सायक्लोथाॅन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
35 ते 40
1. लियानील डाईस – मुंबई
2. किरण पवार मुंबई
3. उदय जामखिंडी – पुणे
41 ते 45
1.पंकज मॉरलेशा – मुंबई
2. रॉबिन फ्रान्सिस – मुंबई
3. जितेंद्र कोकिटकर – मुंबई
46 ते 50
1. असद पालखीवाला – मुंबई
2. मनोज माणिकशो – पुणे 3.रहमान हकीम – नाशिक
51 ते 55
1. शेखर शिंदे औरंगाबाद
56 ते 60
1. मारियन डिसूजा – मुंबई
2. पांडुरंग लहाने – औरंगाबाद
3. शिवाजी राजे – औरंगाबाद
1. मीनाक्षी गायकवाड – ठाणे
61 ते 65
1. सुधाकर पाटणकर – मुंबई 2.भीमराव सुतार – कोल्हापूर
3. काशिनाथ गायकवाड – ठाणे
66 ते 70
1. प्रवीणकुमार कुलते – ठाणे
75 ते 80
1. जयंत सांगवीकर – औरंगाबाद