कोमल एक्स्प्रेस सुसाट; राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे सुवर्णा, आशियाई स्पर्धेसाठी पात्र.

स्पोर्ट्स पनोरमा (प्रतिनिधी)-नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया एक्सलन्स सेंटरची धावपटू कोमल जगदाळे ने राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. महिलांच्या 3003 स्टीप्लेस प्रकारात ती अजिंक्‍य ठरली. त्यामुळे तिचे कौतुक होत असून,या यशाने ती 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सध्या ते 20 वर्षाखालील राष्ट्रीय ऐथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे. नाशिकची कोमल जगदाळे आणि लांब पल्ल्याची धावपटू आहे.

या स्पर्धेत तिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात हे अंतर 9 मिनिटे आणि 51.56 सेकंदात पार केले. या यशाबद्दल कोमल चे कौतुक होत आहे. तिचे हे या स्पर्धेतले हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने याच स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. हे अंतर कोमलने 16:03:53 इतक्या वेळेत पार केले. स्पर्धेत हरियाणाच्या सोनीकाने 17:00:46 वेळेत अंतर पार करत रौप्यपदक पटकावले. एस.बाधो हिने 17:40:41 वेळेत पार करत कांस्य पदक पटकावले. मात्र दोघीही कोमलच्या खूप मागे राहिल्या होत्या. तिच्या यशाने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You might also like

Comments are closed.