स्पोर्ट्स पॅनोरमा (प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये फक्त एक सामना आहे. तर यामध्ये पंजाब समोर कोलकाता नाइट रायडर्सचा आव्हान असणार आहे. यामध्ये पंजाब ने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब साठी एक आनंदाची तर एक दुःखदायक बातमी आहे. संघाचा धडाकेबाज सलामीवीर मयंक अगरवाल ची वापसी झाली आहे तर दुसरीकडे मात्र स्टार खेळाडू ख्रिस गेल मात्र दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे, त्याच्या जागी ऐलनला घेतले आहे. पंजाबने शाहरुख खान नाही संघात घेतले आहे. तो हरप्रीत ब्रार च्या जागी संघात आला आहे.
तर कोलकाता कडून टीम सेलफर्ट हा आयपीएल मध्ये पदापर्ण करणार आहे, शिवम मावीचीही संघात वापसी झाली आहे, तर संदीप वैरियर व लौकी फर्ग्युसन ला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने दोन्ही संघाला या सामन्यात विजय अत्यावश्यक आहे त्यामुळे दर्शकांना एक रोमांचक सामना बघावयास भेटणार आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
केकेआर-व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन, दिनेश कार्तिक, नितीश राणा, टिम सिल्फर्ट, सुनील नारायण, शिवम मावी, टीम साऊदी, वरून चक्रवती
पंजाब-के एल राहुल, मयंक अगरवाल, एडन मार्करम, निकोलस पूरन, शाहरुख खान, दीपक हूडा, फॅबियान ॲलन, नॅथन एलिस, मोहम्मद शामी, रवी बिश्नोई, अर्षदीप सिंग