शोतोकान कराटे क्रीडाप्रकारात देशात अव्वल कामगिरी बजाविलेला कराटेपटू सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत, त्याच्या आयुष्यासाठी सारेजण एकवटले आहे, तो बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत. संतोष हरिश्चंद्र मोहिते हे या कराटेपटू चे नाव आहेत. ते सातारा तालुक्यातील नागठान्याचे आहे. शोतोकान कराटेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
केवळ राज्यातच नव्हे, तर देशात स्वतःचा लौकिक निर्माण केला आहे. शोतोकान कराटे अन् मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात त्यांनी अनेक पदके पटकाविली आहेत. खेळाडू म्हणून यश पटकावल्यानंतर ते पूर्णवेळ प्रशिक्षणाकडे वळले. नागठाणे परिसरासह सातारा,बारामती, रायगड,दमन,गुजरात आदी ठिकाणी त्यांनी कराटेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 80 राष्ट्रीय दोनशेहून अधिक राज्यस्तरीय कराटेपटू निर्माण झाली आहे, जिल्ह्यातील महिला पोलिसांना ही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.