पुणे(प्रतिनिधी)-महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका चौदा वर्षीय महिला कबड्डी खेळाडू वर कोयत्याने वार करून तिघांनी हत्या केल्याचे वृत्त आहे.या क्रूर हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली असून या पुढील तपास सुरू आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केला यासाठी त्यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.
पुण्याचे बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स या ठिकाणी ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे असे मृत कबड्डी खेळाडूचे नाव आहे. क्षितीजा नियमितपणे कबड्डीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती.त्यावेळी बावीस वर्षीयआरोपी शुभम भागवत हे त्या ठिकाणी आला व त्याने क्षितिजाला बाजूला घेऊन बोलायला सुरुवात केली.
यादरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला व काही कळायच्या आतच आरोपीने कोयत्याने क्षितिजावर वार केले.या हल्ल्यामध्ये क्षितीजाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. आरोपी जवळ पिस्तूल असल्याची माहिती मिळत आहे. या आठवीत शिकणाऱ्या मुलींच्या दूरच्या नातेवाईकांचे एकतर्फी प्रेम हे निर्गुण हत्या मागेल कारण असू शकते असे सांगण्यात आले.
दरम्यान महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले,’यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणे हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल’