जालना(प्रतिनिधी); डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे नुकत्याच आंतरमहाविद्यालयीन कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन शहरातील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना संचालित सी.पी. अध्यापक महाविद्यालयात केले होते. या स्पर्धेत विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या विविध जिल्ह्यातील महाविद्यालयातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेते महिला व पुरुषसह एकूण १५० मल्लांनी सहभाग नोंदवला.
सदरील स्पर्धा खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये आशिष तोडकर, स्वप्नील शेलार, शुभम थोरात, मोबीन मुलानी हे होते तर राष्ट्रीय खेळाडूंमध्ये परख भक्त हे होते व महिला खेळाडूंमध्ये राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेली जालन्याची प्रिया घुशींगे असे मातब्बर स्पर्धक सहभागी झाले होते. अश्या कीर्तिवंत मल्लांच्या अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यांचा आनंद प्रेक्षकांना बघायला मिळाला. सदरील स्पर्धेतील विजयी मल्ल हे हरियाणा राज्यातील भिवानी येथील चौधरी बन्सीलाल विद्यापीठ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नेतृत्व करतील.
स्पर्धेसाठी उदघाटक म्हणून विद्यापीठाचे बी. सी. यु. डी. चे माजी संचालक प्राचार्य डॉ भागवतरावजी कटारे हे लाभले तर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंदजी भक्त हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रशिया येथून आलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक तिमिरलान बोस्तानो हे होते. याप्रसंगी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष मदनलाल भगत, उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल काबलीये, विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक, ओलीम्पिक असोसिएशनचे सदस्य प्रा. डॉ. उदय डोंगरे, डॉ. भुजंग डावकर, डॉ. नेताजी मुळे, डॉ. प्रशांत तौर, डॉ. हेमंत वर्मा, डॉ. बप्पासाहेब म्हस्के, प्रा. डॉ. भिकूलाल सले डॉ. शेख फिरोज, डॉ. संदीप जगताप, डॉ. भागचंद सानप, डॉ. धांडे, डॉ. वनगुजरे, डॉ. परभने, डॉ. कदम, डॉ. गाडेकर, डॉ. शेखर शिरसाट इत्यादी क्रीडा संचालक उपस्थित होते, तर या स्पर्धेत पंच म्हणून प्रा.डॉ. शाम काबुलीवाले, प्रा. मंगेश डोंगरे, नितीश काबलीये, सोमनाथ बकळे, मुख्तार पटेल, मसूद हाशमी, सज्जनसिंग जारवाल, डॉ. जी. सूर्यकांत, डॉ. रामेश्वर विधाते, मनोज शेटे इत्यांदींनी काम पहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सी.पी. अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कान्हेरे, प्रा. गजानन जगताप, प्रा. जगन्नाथ सावंत, प्रा. राजेंद्र काळे, प्रा. किशोर घोरपडे, प्रा. प्रदीप शिंगणे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. सचिन वाघ, प्रा. विजय कमळे पाटील, नरेंद्र मुंढे,संजय चौरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले
विजयी महिला संघातील मल्ल
५० किलो – गिरगे सोनाली, ताराई महाविद्यालय, पैठण
५३ किलो – आमरीन सय्यद, ए. बी. महाविद्यालय, देवगाव रंगारी
५५ किलो – नेचे भाग्यश्री, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद
५७ किलो – वर्दे रुपाली, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद
५९ किलो – बारवाल तेजस्विनी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद
६२ किलो – प्रतीक्षा जाधव, ए. बी. महाविद्यालय, देवगाव रंगारी
६५ किलो – चांदीले कविता, राष्ट्रीय महाविद्यालय, हतनूर
६८ किलो – भोसले माधुरी, भगवान महाविद्यालय, आष्टी
७२ किलो – बोरसे भारती, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद
७६ किलो – घुशींगे प्रिया, राजकुंवर महाविद्यालय, जालना
विजयी पुरुष संघातील मल्ल –
५७ किलो – आशिष तोडकर, भगवान कॉलेज, आष्टी
६१ किलो – स्वप्नील शेलार, धोंडे कॉलेज, आष्टी
६५ किलो – अर्जुन बागडे, कला महाविद्यालय, सावंगी
७० किलो – शुभम थोरात, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा
७४ किलो – कृष्णा गवळी, कला महाविद्यालय, सावंगी
७९ किलो – सागर शिंदे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आष्टी
८६ किलो – मोबीन मुलानी, आर. एस. एम. शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कळंब
९२ किलो – हर्षल जगदाळे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नळदुर्ग
९७ किलो – परख भक्त, श्री आर. डी. भक्त औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, जालना
९७ ते १२५ किलो – पांडुरंग मोहरे, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद