स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये दुसऱ्या सामनामध्ये मुंबईसमोर पंजाबचे आव्हान होते तर यामध्येमुंबई इंडियन्स ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स सलग तीन सामने गमावून अडचणीत सापडले होते.
आज मात्र पंजाबचा पराभव करत त्यांनी पराभवाची मालिका खंडित केली. मुंबई इंडियन्स ने पंजाबचा सहा विकेट्सने पराभव केला. मयंक अगरवाल ची गरज पंजाबला चांगलीच भासली.
नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स ने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला. पंजाब कडून एकाही फलंदाजाने अर्धशतक नाही ठोकले. त्यामुळे त्यांना फक्त 135 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाब कडून सर्वाधिक धावा मारक्रम णे 42 धावा केल्या.
तर मुंबईकडून बूमराह व पोलार्डने प्रत्येकी दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना मुंबईची ही सुरुवात चांगले राहिले नाही कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव लवकरच तंबूत परतले.
त्यानंतर मात्र सौरभ तिवारी व डीकौक ने संघाचा डाव सावरला. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक 45 धावा तर हार्दिक पांड्या ने 40 धावांचे योगदान दिले. तर पंजाब कडून रवी बीष्णोईने दोन गडी बाद केले.या विजयासह मुंबई इंडियन्स ने प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याचे आशा पल्लवित ठेवल्या आहे.
किरॉन पोलार्ड सामनावीर ठरला
त्याने एका षटकात दोन गडी बाद करून फलंदाजीमध्ये ही 15 धावांचे योगदान देऊन अष्टपैलू कामगिरी केली
उद्या राजस्थान समोर बेंगलोर चे आव्हान असणार आहे.