औरंगाबाद(प्रतिनिधी)-इंडियन कॅलेंडर फोर्स व औरंगाबाद जिल्हा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट मनाली हिमाचल प्रदेश येथे पर्वतरोहन प्रशिक्षण शिबिर होणार आहे. तर या शिबिरासाठी कॅडेट कोर्स चे कमांडर विनोद नरवाडे व एम एस एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी सुरज मुलाने, शोएब पठाण, मनीष पहाडिया, उदय भान सिंह होली ये हे चार कॅडेट सदर प्रशिक्षण शिबिरासाठी मनाली येथे रवाना झाले आहे.
हे शिबिर 1 ऑक्टोबर 2021 पासून 26 ऑक्टोबर 2021 पर्यंत सव्वीस दिवसांचे असणार आहे. या शिबिरामध्ये खडक, बर्फावर चालण्याचे मूलभूत तंत्र, नकाशा वाचन,नेवीगेशन,हवामान, औषधी,पर्वत,स्वच्छता,रॅपलिंग, भारतीय पर्वत रोहणा चा इतिहास, पर्वतरोहनाचे साहित्य निर्मिती व निगा राखणे हिम नदी ची माहिती इत्यादी सर्व आवश्यक बाबीचे या शिबिरामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या