छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली आयोजित ईएमएमटीसी ज्युनियर क्ले कोर्ट नॅशनल १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या रिवान परमारने धक्कादायक निकाल नोंदवला. त्याने कर्नाटकच्या १४ व्या मानांकित लिखित जनार्धनाचा ०-६, ६-१, १०-७ असा पराभव करत पात्रता फेरीतील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील विभागीय क्रीडा संकुलातील एन्ड्युरन्स-एमएसएलटीए मराठवाडा टेनिस सेंटर (ईएमएमटीसी) येथे खेळवली जात आहे.
अन्य एका सामन्यात, अद्विक खन्नाने दोहद कासळेचा ६-४, ६-७(५), १०-८ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजय मिळवला. मुलींच्या गटात रिया कुलकर्णीने हरियाणाच्या वृद्धी मेहरोत्रावर ६-०, ६-१ अशी सहज मात केली.
पहिल्या पात्रता फेरीतील मुलांच्या गटातील इतर निकाल पुढीलप्रमाणे आहेत: आरव चाबूकस्वार (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध विराज व्यवहारे (महाराष्ट्र) ६-०, ६-०; १५ वा मानांकित ओजस मिश्रा (मध्य प्रदेश) विजयी विरुद्ध देवेन उधान (महाराष्ट्र) ६-०, ७-५; डेव्हिन पिट्टन (केरळ) विजयी विरुद्ध पृथ्वीराज भिवसने (महाराष्ट्र) ६-०, ६-१; आरुष खन्ना (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध आरव जयस्वाल (महाराष्ट्र) ६-१, ६-०.
मुलांच्या गटातील उर्वरित निकालांमध्ये बलराज बिराजदार (महाराष्ट्र) याने आरुष देशपांडे (महाराष्ट्र) याला ७-५, ६-२ असे नमवले. रायन वेपकोंमा (तेलंगणा) याने आदित्य शाहचा (महाराष्ट्र) ६-३, ६-० असा पराभव केला. कबीर पाटील (महाराष्ट्र) याने सार्थक महाजन (महाराष्ट्र) याला ६-३, ६-४; अद्विक विनोद (महाराष्ट्र) याने खुश पारीख (गुजरात) याला ६-३, ७-५ असे पराभूत केले.
तसेच, के. आडगावकर (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध अक्षज हेगडे (महाराष्ट्र) ६-३, ६-४; वियान पेंडूरकर (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध तविश लोहिया (पश्चिम बंगाल) ६-२, ६-१; आदित्य उपाध्ये (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध कृषांग शर्मा (महाराष्ट्र) ६-४, ६-३; कियान पेंडूरकर (महाराष्ट्र) विजयी विरुद्ध विहान सावर (महाराष्ट्र) ६-४, ६-२ आणि १६ वा मानांकित श्री मायनेनी (छत्तीसगढ) विजयी विरुद्ध आरव गर्ग (महाराष्ट्र) ६-१, ६-२ असे मुलांचे निकाल राहिले.
मुलींच्या पहिल्या पात्रता फेरीतील निकालांमध्ये वान्या पुंडीर (छत्तीसगढ) हिने काव्या मालेगावकर (महाराष्ट्र) हिचा ६-१, ६-१ असा पराभव केला, तर अक्षिता मठापती (महाराष्ट्र) हिने प्राची कुमार (कर्नाटक) हिला ६-१, ६-३ असे पराभूत केले.









