• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

एफआईजी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चे पंच परीक्षेत डॉ. जोशी व कदम उत्तीर्ण.

by pravin
March 31, 2025
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, जिम्नॅस्टिक
एफआईजी एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स चे पंच परीक्षेत डॉ. जोशी व कदम उत्तीर्ण.

FIG (आंतरराष्ट्रीय जिम्नास्टिक्स महासंघ) तांत्रिक समिती प्रमुख तामी यागी (जपान) व तांत्रिक समिती उपाध्यक्ष क्रिस्तीना (इटाली) यांच्या समवेत डॉ. मकरंद जोशी, सिद्धार्थ कदम, सागर बिडीवाला व रंजन सिंग

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): नुकत्याच पार मनीला, फिलिपिन्स येथे आंतरराष्ट्रीय जिम्नास्टिक्स महासंघ द्वारे एरोबिक्स जिम्नॅस्टिकच्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेत भारतातून चार पंच परीक्षेसाठी पाठवण्यात आले होते. यात महाराष्ट्राचे डॉ. मकरंद जोशी व सिद्धार्थ कदम हे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे.
डॉक्टर मकरंद जोशी हे 2001 पासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत पूर्ण होणारे भारताचे सर्वात अनुभवी पंच आहेत. दर ऑलिंपिक नंतर होणाऱ्या जिम्नास्टिक्स मधील गुणप्रदान संहिते नुसार पंच परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. डॉक्टर मकरंद जोशी यांनी 2001, 2005, 2009, 2013, 2017, 2022, व 2025 अशा सात ऑलिंपिक सायकलच्या परीक्षा सातत्याने उत्तीर्ण होत पंच पात्रता 3 स्तर प्राप्त केला आहे. हा स्तर प्राप्त करणारे ते भारतातील एकमेव पंच आहेत.

तसेच त्यांची एशियन जिम्नॅस्टिक्स युनियन वर एरोबिक जिम्नास्टिक्सच्या तांत्रिक समितीचे सचिव म्हणून 2023 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धार्थ कदम यांनीही 2017 2022 2025 च्या तीन ऑलिंपिक सायकल च्या पंचपरीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होत आपला ठसा उमटवला आहे.

दोघांचेही या यशाबद्दल जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधीर मित्तल, कोषाध्यक्ष कौशिक बिडीवाला,महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय शेटे,उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी, सहसंचालीका भारतीय क्रीडा प्राधिकरण NCOE पश्चिम विभाग केंद्र डॉ. मोनिका घुगे, युवराज नाईक क्रीडा व युवक सेवा संचालनालय छत्रपती संभाजीनगर, मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव श्री.हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी,डॉ.विशाल देशपांडे, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहीत रोंघे, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे,सौ.तनुजा गाढवे यांनी सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Dr. Makarand Joshi.FIG Aerobics Gymnastics Final Exam newsInternational Gymnastics Federation NewsManilaphilippines
ShareTweetSend
Next Post
राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अर्जुन सोनवणे, स्वामिनी डोंगरे, देवेन पात्रीकर यांना पदक.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अर्जुन सोनवणे, स्वामिनी डोंगरे, देवेन पात्रीकर यांना पदक.

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.