छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): छत्रपती संभाजी नगर फेन्सिंग संघटना व वॉरियर फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ते 4 मे 2023 रोजी वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको येथे सहाव्या वॉरियर फेन्सिंग लीग स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, डी आर डी ओ चे माजी संचालक श्री काशिनाथ देवधर, डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरूळ, नितीन राठोड (सचिव वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ), प्रा. डॉ. विजय भोसले, (प्राचार्य शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय) यांची उपस्थिती होती.
वॉरियर फेन्सिंग लीग स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात या स्पर्धेमध्ये रायगड फेन्सर्स, शिवनेरी फेन्सर्स, देवगिरी फेन्सर्स व वॉरियर फेन्सर्स असे चार संघ सहभागी झाले आहेत. सदरील स्पर्धा या १२,१४, १८वर्षे वयोगटात होणार असून मुले व मुली मिळून एकूण १२० खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व खेळाडूंनी मार्च पास सादर केला याप्रसंगी प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी मानवंदना स्वीकारली.याप्रसंगी स्पर्धेची प्रास्ताविक प्रा. डॉ. उदय डोंगरे यांनी केले. या प्रस्ताविकामध्ये डॉ डोंगरे यांनी तलवारबाजी खेळाची शहरात वाटचाल व तलवारबाजी संघटनेचे ऑलिंपिक खेळाडू घडवणे हे ध्येय उद्देश असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रा. डॉ प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये तलवारबाजी खेळातील प्रगती, अखिल भारतीय अंतर्विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेतील यश तसेच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेतील खेळाडूंची नेत्रदीप कामगिरी पाहता तलवारबाजी खेळाडूंसाठी सर्वत्र मदत करणार असल्याचे नमूद केले
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तलवारबाजी चे अद्यावत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे नमूद केले. प्राचार्य डॉ. भरत खंडारे , डॉ. योगिता होके पाटील, प्रा. डॉ. गौतम पाटील, प्रा.डॉ.रवी किरण सावंत, मा. दत्ता भांगे , नितीन जाधव यांच्यासह अधीसभा सदस्य गणेश खैरे, मनोज शेवाळे, पूनम पाटील, डॉ व्यंकटेश लांब, डॉ विक्रम खिल्लारे, बंडू सोमवंशी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. गजानन सानप यांनी तलवारबाजी खेळाची प्रगती पाहता नक्कीच आगामी काळामध्ये छत्रपती संभाजी नगर शहरातून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास व्यक्त केला व संघटनेच्या माध्यमातून घेतले जाणारे लिग स्पर्धा, जिजाऊ जयंती निमित्त खेळाडूंच्या माताचा सत्कार, ऑलम्पिक दिन आदी विविध उपक्रमाचे कौतुक केले. व विद्यापीठामध्ये सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नमूद केले. तसेच या स्पर्धेतील विविध टीमचे संघ प्रमूख महेश पवार ,स्वप्निल शेळके, आकाश आरमाल, प्रशांत शहा यांचा देखील स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आज झालेल्या स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल.
U – 12 इप्पी मुले
1) वरद जाधव ने अमेय गोरे ला 6-1 या स्कोर ने हरवले
2) साईराज बलांदे ने आरव जाधव ता 5-0 या स्कोर ने हरवले
U 12 फॉईल मुले
1) यशराज निभोरे याने देवेने पाथ्रीकर ला 5-3 या स्कोर हरवले
2) समर्थ डोंगरे याने नय थोटे याला 5-2 या स्कोर हरवले
U 12 हॅपी मुली
1) श्रीजा घुले हीने सौम्या साठे हीला 3-4 ने हरवले
U 12 सेबर मुली
1) भक्ती सोनवणे हीने श्रेया मोईम हीला 5-1 या गुनसंख्येने हरवले.
U 12 फॉईल मुली
1) स्वामींनी डोंगरे ने वैष्णवी कावळे हीला 5-3 ने हरवले
U 14 फॉइल मुली
1) यशश्री वंजारे हिने कनक भोजने ला 5-4 या स्कोर ने हरवले
2) मानसी हुल्सुरकर हिने अनुष्का अंकमुळे 5-4 या स्कोर ने हरवले
U 14 सेबर मुले
1) स्पर्श जधाव याने रुजलं वनारसे 5-2 या स्कोर ने हरवले
2) रुशीरकेश सोनार याने नेयस जोधव 5-4 या स्कोर ने हरवले
U 12 सेबर मुली
1) तनुजा लहाने हिने ऋतुजा मंमोडे
5=0 या स्कोर ने हरवले
या स्पर्धेचे अनिल देवकर व जयदीप पांढरे स्पर्धा प्रमुख काम पाहत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ उदय डोंगरे,सागर मगरे, डॉ. दिनेश वंजारे , स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, तुषार आहेर,निखिल बाविस्कर, ,राहुल दनके, गौरव गोटे विशाल दानवे प्रशिक साळवे सौरभ शेवाळे बळीराम जगताप सौरभ साळवे अभिजीत नागरे, सर्वेश मिसाळ आदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.