जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबनच काय बडतर्फी आवश्यक:शाम भोसले 

औरंगाबाद (प्रतिनिधि):औरंगाबाद येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी आपल्या कार्यकाळात व्यायाम शाळा साहित्य आणि क्रीडांगण विकास अनुदानासाठी निधी खर्च करताना अनियमितता केली आहे.याबाबत क्रीडा मंत्री सुनील केदार यांना सविस्तर निवेदन दिले होते. शाम राजाराम भोसले क्रीडा संघटक/ काँग्रेस पदाधिकारी (पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी केले होते.

आम्ही खेळ व खेळाडूंच्या हितासाठी झगडत अविरत लढा दिला, शासनाने आठ कोटी रुपये वाचविले, नावंदे यांनी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या ओळखीचा गैरवापर करून ४२ खेळ बंद करत मंत्रालयचा संदर्भा दिला,अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर बडतर्फीचेच गंडांतर आवश्यक आहे.

You might also like

Comments are closed.