जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंच्या चौकशी दरम्यान दुसऱ्या दिवशी काय घडले पाहा

चौकशीच्या विळख्यात कविता नावंदे ?

औरंगाबाद (प्रतिनिधी): क्रीडा व युवक संचालयाने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी चौकशी समिती नियुक्त केली होती. ही समिती ३ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये प्राथमिक चौकशी करत असताना आज ४ डिसेंबर २०२१  (शनिवार ) रोजी  जिल्हानियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध संस्था, ग्रामपंचायती, व्यायामशाळा साहित्याचे गैरव्यवहार प्रकरणी आज वितरण करण्यात आलेल्या साहित्याची पाहणी करण्यात आली . यादरम्यान महानगरपालिकेच्या सूत्रांनी  सांगितले की , आम्ही ज्या आवश्यक साहित्याची  यादी  सादर  केली होती ते  साहित्य आम्हाला देण्यात आलेले नाही. दुसरेच साहित्य आम्हाला देण्यात आले.

चौकशी अधिकारी उपसंचालक,पुणे अनिल चोरमले यांनी खेळाडूंशी क्रीडा प्रबोधिनीच्या सोयींविषयी चर्चा केली असता खेळाडूंनी आहाराविषयी नाराजी व्यक्त केली.  क्रीडा प्रबोधिनीच्या  खेळाडूंना  आहाराविषयी आणि सुविधांविषयी कोणतीही कमतरता भासू न देण्याचे मी पुरेपूर प्रयत्न करेन असे  याप्रसंगी चोमरले यांनी  खेळाडूंना आश्वासन दिले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंच्या चौकशी दरम्यान दुसऱ्या दिवशी काय घडले पाहा
औरंगाबाद क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू क्रीडा व युवक सेवा,पुणे उपसंचालक अनिल चोरमले यांना व्यथा मांडतांना

 

सूत्रांनुसार कळाले की  सर्व कागदपत्रांची पडताळणी करत असतांना असे निदर्शनास आले की जुने अहवालचं  पुन्हा सादर करण्यात आले आहे. याप्रकरणात  शासनाची  प्रत्यक्षरीत्या दिशाभूल करतांना  कविता नावंदे  दिसून येत आहे .

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या चौकशीच्या वेळी मदतीला कोण आले धावून हे स्पोर्ट्स पॅनोरामा आपल्या निदर्शनास लवकरच आणणार आहे.

 

 

 

 

You might also like

Comments are closed.