भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ९० वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयने सामनाधिकारी आणि संघाच्या सपोर्ट स्टाफविषयी मोठा निर्णय घेतला आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटशी संबंधीत इतरही अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आणि चर्चा करण्यात आली. बीसीसीआयने सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे.
बीसीसीआयने सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे. बीसीसीआयचा हा निर्णय सर्व सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सर्व सदस्यांसाठी फायदेशीर असेल यात शंका नाही. आधी वयाचे ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आणि सपोस्ट स्टाफला निवृत्ती घ्यावी लागायची. मात्र, आता बीसीसीआयने याची मर्यादा वाढवून ६५ वर्ष केली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, “सामनाधिकारी आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांची वयोमर्यादा ६० वर्षांवरून ६५ वर्ष केली गेली आहे. पण हे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल.”
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बाबतीत माहिती दिली. अधिकारी यावेळी म्हणाले की, “आता आमच्याकडे दिशानिर्देश आहेत. आता त्यांना निवृत्तीसाठी पाच अधिक वर्ष मिळतील.” बैठकीदरम्यान पुडुचेरी, बिहार आणि उत्तराखंड राज्यांतील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आणि त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. अधिकारी पुढे बोलताना म्हणाला की, “प्रत्येका राज्याच्या बोर्डला १० करोड रुपये मंजूर करण्याला आले आहेत. तसेच, प्रत्येक ठिकाणी इनडोअर सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल.”