छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी)- नुकत्याच पाथरी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धा यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभाग घेत मुले व मुलींच्या संघात प्रथम स्थान पटकावले.
या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्न बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील जवळपास 45 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता मुलींच्या सर्वच वजन गटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खेळाडूंनी बाजी मारली तर मुलांच्या अर्ध्याहुन जास्त वजन गटात मुलांनी वचस्व गाजवीत बाजी मारली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पदक विजेते खेळाडू खालील प्रमाणे
मुली सुवर्णपदक विजेते
1.स्वरूपा कोठावळे -राजर्षी शाहू कॉलेज
2.पायल शेजवळ- हरी सिद्धी महाविद्यालय
3.शितल राठोड -सरस्वती भुवन महाविद्यालय
4.प्रतीक्षा एखंडे -राजश्री शाहू महाविद्यालय
5. आचल विश्वकर्मा -देवगिरी महाविद्यालय
6. समिधा परांजपे -शासकीय आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय
7.राधिका शर्मा -शिवछत्रपती महाविद्यालय
8.मयुरी सोळस
सुवर्णपदक विजेते मुले
1.प्रथमेश शिंदे -राजर्षी शाहू महाविद्यालय
2 यश हिरे – संत सावतामाळी महाविद्यालय
3.स्वयंभू गुप्ता- राजर्षी शाहू महाविद्यालय
4.मोहित सिंग- राजर्षी शाहू महाविद्यालय
5.सचिन मगरे -वाल्मीक राव दळवी महाविद्यालय
रोप्य पदक विजेते
1 रितेश गायकवाड -सरस्वती भुवन इंटेरियर डिझायनिंग महाविद्यालय 2. विनायक बस ये -राजर्षी शाहू महाविद्यालय
कास्यपदक विजेते
1.रूपाली तुपारे -संत सावतामाळी महाविद्यालय
2.अक्षय डकले -राजर्षी शाहू महाविद्यालय
स्पर्धेत संघटनेचे सचिव नीरज बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पंच लता कलवार ,अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर ,अंतरा हिरे ,कोमल आगलावे ‘आशिष बनकर ,शरद पवार, प्रतीक जांभुळकर ,सागर वाघ ,सोमेश्वर नंद गवळी ,आदींनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धा यशस्वी ते करिता हर्षल भुईंगळ ,विवेक देशपांडे, आदींनी परिश्रम घेतले विजेत्या संघाचे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डी के कांबळे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा विभाग प्रमुख तसेच संघटनेचे अध्यक्ष के डी शार्दुल, संतोष सोनवणे, शरद तिवारी, गजेंद्र गवंडर योगेश विश्वासराव ,अविनाश नलावडे, राजू जाधव , डॉ निका रूपरेल , आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत