चेन्नई ची हैदराबाद वर 6 गड्यांनी मात.

प्रतिनिधी-

आज आयपीएलमध्ये चेन्नई समोर हैदराबादच्या आव्हान होते. तर यामध्ये गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर चेन्नईने हैदराबादचा 6 गड्यांनी धुव्वा उडविला आहे. या विजयासह चेन्नईने 18 अंका सह प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित केले आहे. आयपीएल 2021 मध्ये प्ले ऑफ गाठणारी चेन्नई पहिलीच संघ ठरली. उद्या केकेआर समोर पंजाबचे आवाहन असणार आहे.

दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. 4 शतकात मात्र 24 धावा देऊन महत्वाचे तीन गडी बाद करणारा चेन्नईचा जलदगती गोलंदाज हेजलवूड सामनावीर ठरला.चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.तर चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधाराला निराश नाही केले.

वृद्धिमान सहा 44 वगळता हैदराबादचा एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांची समोर टिकू शकला नाही.त्यामुळे हैदराबाद 20 षटकात फक्त 134 धावाच करू शकला तर चेन्नई कडून हेजलवूड ने तीन तर ब्रावोणे दोन गडी बाद केले.सोप्या धावांचा पाठलाग करीत असताना चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. 75 धावा च्या धावसंख्येवर चांगल्या फॉर्मात असलेला महाराष्ट्रीयन सलामीवीर गायकवाड 45 धावांवर बाद झाला.तर डूपलेसिस ने 41 धावांचे योगदान दिले.हैदराबाद कडून होल्डर ने तीन गडी बाद केले. शेवटच्या तीन चेंडूवर दोन धावांची गरज असताना धोनीने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

या विजयासह प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारी चेन्नई पहिली संघ ठरली तर दुसरीकडे हैदराबाद मात्र पहिलेच स्पर्धेबाहेर झाली आहे.

You might also like

Comments are closed.