इंजमाम उल-हक ला हृदयविकाराचा झटका,

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अव्वल फलंदाज इंजमाम ऊल हकला हृदयविकाराचा झटका आला आहे, त्याला तात्काळ लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी इंजमामवर एन्जोप्लास्टी ची ची यशस्वी शस्त्रक्रिया केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. इंजमाम 51 वर्षाचे आहेत. पाकिस्तानचा यशस्वी क्रिकेटपटू, यशस्वी कर्णधार मध्ये इंजमाम ऊल हकची गणना होते.

ईएसपीएन क्रिकइन्फो च्या माहितीनुसार मागच्या तीन दिवसांपासून इंजमाम छातीत दुखत असल्याची तक्रार करत होता. प्राथमिक चाचण्यांमध्ये काही आढळून आले नाही.पण सोमवारच्या चाचणीत इंजमामला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तात्काळ इंजमाम वर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती आता स्थिर झाल्याने डॉक्टरांनी इंजमाम उल हक ला रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.

You might also like

Comments are closed.