मला टॅग करू नका, मी मुख्यमंत्री नाही, भारताचा गोलकीपर वैतागला!

प्रतिनिधी-

पंजाब मध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळात आता एक नवीन गोंधळ समोर आले आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर त्यांच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला. युजर्सनी ट्विट करताना कॅप्टन अमरिंदरसिंग यांना टैग करण्याऐवजी भारताचा फुल फुटबॉलपटू अमरिंदर सिंग याला तयार करण्यास सुरुवात केली. युजर चा काहीतरी गोंधळ उडाल्याच लक्षात आल्यानंतर “मला टैग करू नका,मी मुख्यमंत्री नाही,”चक्क असे म्हणण्याची वेळ गोलकीपर वर आली.

मला टॅग करू नका, मी मुख्यमंत्री नाही, भारताचा गोलकीपर वैतागला!

 

गोलकीपर अमरिंदर सिंग यांनी ट्विट करून लिहिले की, वृत्त माध्यमांनो, पत्रकारांनो मी अमरिंदरसिंग भारतीय फुटबॉल टीमचा गोलकिपर आहे. मी पंजाबचा मुख्यमंत्री नाही. हात जोडून विनंती करतो की मला टैग करू नका.

गोलकीपर अमरिंदर सिंग यांनी ट्विट केल्यानंतर खुद्द कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दखल घेत ट्विट शेअर करत म्हणाले, माझ्या तरुण मित्रा, मी तुझ्या त्रासाबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. तुझ्या पुढील खेळासाठी शुभेच्छा.

You might also like

Comments are closed.