जालन्याचा आकाश गोरे ची महाराष्ट्र संघात निवड.

जालना(प्रतिनिधी)-जालन्याच्या ग्रामीण भागातील परतूर तालुक्यातील आकाश गोरे यांची मथुरा येथे होणार्‍या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. आकाश गोरे हा स्फोटक फलंदाजी करतो.नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जालन्याचा पहिल्याच राऊंडमध्ये दारुण पराभव झाला मात्र जालना कडून आकाश गोरे याने नेत्रदीपक कामगिरी करून निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेतले.त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.जालन्यातून महाराष्ट्र संघात निवड होणारा तो एकटाच खेळाडू आहे. याच पार्श्वभूमीवर जालना टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे त्याचे स्वागत व सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच याच वेळी विटी दांडू खेळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नवगिरे यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला . उपस्थितांच्या वतीने आकाश गोरे व प्रशांत नवगिरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जालना टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश देशमाने, सचिव संतोष आढे, वसीम मणियार, फिरोज अहमद व तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी आकाश गोरे ला स्पॉन्सरशिप करणारे अनिस पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत नवगिरे व निलेश देशमाने बोलताना म्हणाले की, अनिस पठाण सारखे लोकांमुळे खेळाडूंना अधिक चांगले प्रदर्शन करण्याची आवड निर्माण होते. शेवटी संतोष आढे यांनी आभार प्रदर्शन केले.

You might also like

Comments are closed.