भारतीय संघाचा प्रस्तावित न्यूझीलंड दौरा पुढील वर्षापर्यंत रद्द करण्यात आला आहे. फ्युचर टूर प्रोग्रॅम नुसार विराट कोहली अँड कंपनी वर्ल्ड कप सुपर लीग क्वालिफाय करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध तीन वनडे सामने खेळायचे आहे. पण कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंड क्रिकेट बुलढाणा ही मालिका रद्द केली. किंवा बोर्डाने अनेक मालिका रद्द केले आहेत आणि त्यामुळे अनेक संघ न्यूझीलंड दौरा करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्या व्यतिरिक्त न्यूझीलंड संघ पुढील वर्ष बांगलादेश,नेदरलँड,दक्षिण आफ्रिका आणि महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. आता भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2022 नंतरच न्यूझीलंड दौर्यावर जाऊ शकतो.
न्युझीलँड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. फ्युचर टूर प्रोग्राम नुसार भारताचा न्यूझीलंड दौरा होणार नाही आणि तो पुढील वर्षी नोव्हेंबर नंतरच होईल. या कालावधीत न्यूझीलंडचा संघही नोव्हेंबर पर्यंत विविध देशाच्या दौऱ्यावर असणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तानात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दाखल झाला आहे. त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी यूएईत दाखल होईल आणि नंतर भारत दौऱ्यावर येईल. टी-20 वर्ल्ड कप नंतर किंवा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे आणि तेथेच तीन टी-20 सामन्याची मालिका खेळेल.