सनरायझर्स हैदराबाद चा जलदगती गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढडला आहे. हैदराबादच्या ताफ्यात कोरोणाचा शिरकाव झाल्यानंतर ही दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद बाद यांच्यातील सामना नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही कोरोणा चा शिरकाव झाल्यानंतर मायकल वौनने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
वौनने टी नटराजन कोरोना पॉझिटिव आल्यानंतर एक ट्विट करून बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. मॅंचेस्टर कसोटी प्रमाणे आयपीएल सामना रद्द होतो का पाहूया. मला खात्री आहे की,सामना रद्द होणार नाही. अशा आशयाचे ट्विट मायकल वौनने केले आहे.
आयपीएल पूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी पूर्वी भारतीय ताफ्यात कोरोणा चा शिरकाव झाला होता. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य स्टाफ सदस्यांना कोरोना ची लागण झाल्याचे समोर आले आहे. भारतीय संघासोबत असणारे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोना ची लागण झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना रद्द करण्याची वेळ आली होती.