आज आयपीएल मध्ये चेन्नई समोर बेंगलोर चे आव्हान असणार आहे तर यामध्ये चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. आरसीबी ने संघात दोन बदल केली आहे. अष्टपैलू खेळाडू जेमिसन च्या जागी टीम डेव्हिड हा आयपीएल मध्ये पदापर्ण करणार आहे तर सचिन बेबी जागी नवदीप सैनी ला संघात घेतले आहे. तर दुसरीकडे चेन्नईने संघात कोणताही बदल केलेला नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आरसीबी ने तीन षटकात 28 धावा केल्या होत्या.
संघ पुढील प्रमाणे
चेन्नई-फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन आली, सुरेश रैना, अंबाती रायडू,एम एस धोनी, रवींद्र जडेजा, डीजे ब्रावो, दीपक चहर, शार्दुल ठाकुर,जौश हेजलवूड.
आरसीबी-विराट कोहली,देवदत्त पदिक्कल, एस भारत, ए बी डीविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, हासारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद शिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी