जालना(प्रतिनिधी)-राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून संघाने सहभाग घेतलेला आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये परभणीच्या संघाने जालना संघाला आठ विकेट्सने हरवून दणदणीत विजय मिळविला आहे.
यामध्ये परभणीचा स्टार खेळाडू अमन शेख हा सामनावीर ठरला. त्याने गोलंदाजीमध्ये दोन विकेट्स बाद करून फलंदाजी मध्ये 25 धावा करत अष्टपैलू कामगिरी केली.
नाणेफेक जिंकून परभणी ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. जालना ने पाच षटकात 58 धावा करून परभणी समोर 59 धावांचे आवाहन उभे केले.
जालना कडून सर्वाधिक निवास पवारणे 29 धावा केल्या तर अमोल साळवे ने 14 धावा केल्या. धावांचा पाठलाग करीत असताना कर्णधार अमन शेख व इम्रानने संघाला चांगली सुरुवात करून दिली. अमन 25 धावा करून बाद झाला तर इम्रानने 14 धावा केल्या. जालना कडून निवास ने एक गडी बाद केला तर एक फलंदाज रन आऊट झाला.