गोलंदाजाची अप्रतिम कामगिरी, चेन्नई ने आरसीबी ला 156 धावातच रोखले.

स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग समोर आरसीबी चे आव्हान आहे. यामध्ये आरसीबी ने पहिल्या डावात 156 धावा केल्या. आरसीबी कडून देवदत्त पदिक्कल सर्वाधिक 70 धावा केल्या. तर कर्णधार विराट कोहलीने 53 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय कोणीही चांगला खेळू शकला नसल्यामुळे आरसीबी ला फक्त 156 धावातच समाधान मानावे लागेल.

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थोड्या वेळासाठी चेन्नईला हा निर्णय फार महाग पडला, कारण आरसीबी च्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली होती. असे वाटत होते आरसीबी 200 धावांचा टप्पा पार करणार मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून संघाला वापसी करून दिली. एक वेळ आरसीबीची 139/1 अशी होती तर नंतर156/6 अशी झाली.

स्टार खेळाडू डिव्हिलियर्स व मॅक्सवेल हे सपशेल अपयशी ठरले. पदापर्ण करणारा टीम डेव्हिड ही फक्त एक धाव करून बाद झाला.

चेन्नई कडून अष्टपैलू खेळाडु ड्वेन ब्रावो ने सर्वाधिक तीन गडी बाद केले.तसेच शार्दुल ठाकूरने दोन तर दीपकच्या चाहरणे एक गडी बाद केला.

You might also like

Comments are closed.