औरंगाबाद-बुलढाणा येथे 2 ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान झालेल्या 90 व्या वरिष्ठ पुरुष गटाच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबाद च्या टाक्स बॉक्सिंग अकॅडमी च्या अर्जुन तोमर (71 kg गट) तर विकास नरवाडे (60 kg गट) उल्लेखनीय कामगिरी करत आपआपल्या वजन गटात कांस्यपदक प्राप्त केले. या खेळाडूंना प्रमुख मार्गदर्शन प्रशिक्षक राहुल टाक यांचे लाभले.
या यशाबद्दल औरंगाबाद विभागाच्या क्रीडा उपसंचालिका श्रीमती. उर्मिला मोराळे,महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष डॉ. केजल भट, सचिव पंकज भारसाखळे यांनी अभिनंदन केले.