पंजाबचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वा मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब समोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. यामध्ये किंग्स इलेव्हन पंजाब ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाब च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे.किंग्स इलेव्हन पंजाबचा स्टार खेळाडू क्रिस गेल हा या सामन्यांमध्ये खेळणार नाही. किंग्स इलेव्हन पंजाब कडून एडन मार्करम, आदिल रशीद व ईशान पोरेल हे तीन खेळाडू आयपीएलमध्ये पदापर्ण करणार आहे. तर राजस्थान कडून इव्हान लेविस, लियाम लिविंगस्टोन, मुस्तफिजुर रहमान व क्रिस मॉरिस हे चार ओवरसीस खेळाडू असणार आहे. तसेच राजस्थान स्टार खेळाडू बेन स्टोक्स व जोस बटलर विना खेळणार आहे.

 

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे- किंग इलेव्हन पंजाब-के एल राहुल(कर्णधार-यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, एडन मार्करम, दीपक हूडा, फेबियन ऐलन, आदिल रशीद, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह व ईशान पोरेल.

राजस्थान रॉयल्स-यशस्वी जयस्वाल, ईवान लेवीज, संजू सॅमसन ( कर्णधार-यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लॉम्रोर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान,चेतन सकरिया व कार्तिक त्यागी

You might also like

Comments are closed.