ब्रेकिंग; क्रीडा प्रबोधिनी पुणे येथील 27 खेळाडूं पॉझिटिव्ह

पुणे(प्रतिनिधी)- तिसऱ्या लाटेमध्ये ओमिक्रॉन आणि कोविड-१९ पॉझिटिव्हचे प्रमाण वाढत असतांना खेळाडूंनाही यामध्ये गाठले आहे.शिवछत्रपती क्रीडा संकुल  ,बालेवाडी ,पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये आज रॅपिड अँटीजेन चाचणी घेतली  यात एकूण 227  खेळाडूंपैकी 27 पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये जयपूरहून आलेल्या खेळाडूंचा अधिक समावेश आहे.तसेच विविध ठिकाणांहून खेळाडू स्पर्धा खेळून आल्यानंतर  पॉझिटिव्ह होत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे .

 

याविषयी क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांना संपर्क साधला असता ते याबाबत असे म्हणाले कि ,खेळाडू विविध ठिकाणी स्पर्धा खेळण्याकरिता जात आहे. नुकताच जयपूरहून आलेल्या  संघापैकी बहुतेक खेळाडू  पॉझिटिव्ह  आले आहेत . पीएमसीचे डॉक्टरांचे पथक सर्व खेळाडूंची तपासणी करत आहे. आम्ही सर्व २७ खेळाडूंना विलगीकरण कक्षात  ठेवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

तसेच आम्ही बकोरीयांना  विचारले कि ,यामध्ये खेळाडू ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आहेत कि कोविड-१९  पॉझिटिव्ह आहेत   तर ते म्हणाले कि ,”अँटीजेन चाचणी केली आहे आणि पीएमसीचे पथक याविषयी तपासणी करत आहे काहीवेळातच  पॉझिटिव्ह खेळाडूंची माहिती आपल्या पर्यंत पोहचेल”.

क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे अजून खेळाडू पॉझिटिव्ह न होण्याकरता सर्व कर्मचाऱ्यांचीही व प्रशिक्षकांची तपासणी करण्यात येत आहे. मैदानावर येत असताना आणि  खेळण्यासाठी स्पर्धेसाठी जात असताना काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व खेळाडूंनी जास्तीत  जास्त काळजी घेणे महत्त्वाचे वाटत आहे.

You might also like

Comments are closed.