मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र यामध्ये बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी केलेलं ट्विटमुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. यामुळे त्यांना जोरादार ट्रोल केलं जात आहे.
मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं. या पार्श्वभूमीवर अशोक पंडित यांनी राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला गोल्ड मेडल मिळालं, असं ते म्हणाले.
मात्र या ट्विटमुळे त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. “सुवर्ण पदक पटकवल्याचा आनंद दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर, किमान खेळात तरी राजकारण सोडा, मोदींच्या काळात भारताने क्रिकेटमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही, याबद्दल देखील काहीतरी बोला” अशा आशयाचे ट्विट करत अशोक पंडित यांना ट्रोल केलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, स्वरा भास्कर, नेहा धूपिया, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, राहुल बोस, मधुर भंडारकर, विकी भगनानी, हेमा मालिनी, मिनिषा लांबा आणि इतर काही कलाकारांनी ट्विटरद्वारे आनंद व्यक्त करत नीरज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.