सोलापूर (प्रतिनिधी): जिम्नॅस्टिक असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने बीपीएड कॉलेज नेहरूनगर येथे 14 डिसेंबर दुपारी 4 वाजता आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक सबज्युनिअर व मिनी गटाच्या मुले व मुलींच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी सोबत वयाचा पुरावा व आवश्यक साहित्यसह उपस्थित राहावे
खेळाडूंची जन्मतारीख ही 10 वर्षे साठी 2013 नंतर, 12 वर्षे साठी 2011 नंतर व 14 वर्षे साठी 2009 नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र ठरतील यामधून निवडलेले संघ हा डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सहभागी होईल खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव संतोष खेंडे 9850666795 अमित कोर्टिकर 7020832374व संतोष संगवे 9405560545 यांच्याशी संपर्क साधावा तसेच स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिम्नॅस्टिक असोसिएशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण ,उपाध्यक्ष प्रकाश पवार सचिव प्रा. संतोष खेंडे यांनी केले आहे