छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): राज्याच्या क्रीडा विभागातील तीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह एका उपसंचालकांविरोधात भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामे केल्याच्या आरोपावरून विभागांतर्गत चौकशी (departmental enquiry) सुरू आहे. मात्र ही चौकशी दाबण्यासाठी अधिकारी पातळीवरून प्रयत्न केले जात असून क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sports Minister Sanjay Bansod) यांना याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. ही चौकशी दाबण्यामागे कोणाचा हात आहे हे मंत्री शोधून काढतील का? असा प्रश्न या विभागातील अन्य काही अधिकारी उपस्थित करत आहेत.
सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Nagpur Winter Session) सुरू आहे. जळगावचे (Jalgaon) जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक, भंडारा (Bhandara) जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (निलंबित) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sabhajinagar ) यांच्यासह अमरावती (Amaravati) विभागाचे क्रीडा विभागीय उपसंचालक विजय संतन यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या (corruption charges) आरोपावरून विभागांतर्गत चौकशी सुरू आहे.
निलंबित क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची करण्यात येणारी चौकशी हि सातारा येथील २०१२ मधील प्रकरणापासून आणि अहमदनगर येथील २०१८-१९ तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी असताना नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळेस खात्या अंतर्गत चौकशी करण्यात आली होती . यामध्ये छत्रपती संभाजीनगर माजी उपसंचालक उर्मिला मोराळे , माजी अमरावती उपसंचालक प्रतिभा देशमुख ,पुणे उपसंचालक प्रमोधिनी अमृतवाड यांच्यामार्फत २०१९ साली प्राथमिक चौकशी मधे नावंदे यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे नावंदेची दुसऱ्यांदा खातेनिहाय चौकशी करण्यात आलेली आहे.
नावंदे यांची चौकशी करण्यात येत असताना हि चौकशी निपक्षपाती करण्या करिता निलंबित करून चौकशी करण्यात यावी असे सातारा ,अहमदनगर येथील सर्व क्रीडा संघटनामार्फत मागणी करण्यात येत होती .जिल्हा सातारा,अहमदनगर येथे आर्थिक गैरव्यवहार आणि शासनाची दिशाभूलचा ठपका ठेवण्यात आलेले तसेच छत्रपती संभाजीनगर येथील मनपा शाळांच्या क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या 7 शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
स्पोर्ट्स पॅनोरमा इम्पॅक्ट : भ्रष्ट जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेची हकालपट्टी
या चौघांपैकी कविता नावंडे यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे तर अन्य तिघांची चौकशी अजूनही सुरू आहे. देशभरात कोरोनाची लाट (corona pandemic) असताना घनश्याम राठोड यांनी जमीन समतल करण्याच्या कामाचा ठेका मर्जीतील व्यक्तीला दिला होता. देशभरात सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कुठलेही काम होत नसताना राठोड यांनी त्यांच्या मर्जीतील कॉन्ट्रॅक्टरला (contractor) काम देऊन प्रत्यक्षात कुठलेही काम न करता निधीचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
रवी नाईक यांनी देखील चुकीच्या पद्धतीने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला ऑर्डर काढून गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर कविता नावंडे यांच्यावर शासकीय कामात गैरव्यवहार, आपल्या मर्जीतील पुरवठादारला काम देणे, तसेच भ्रष्टाचारचे गंभीर आरोप आहेत.
या सर्व अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी (DE) सुरू असताना मंत्र्यांना अंधारात ठेवून अधिकारी पातळीवर ही चौकशी दाबण्याचा आणि या अधिकाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप क्रीडा खात्यातीलच (sports department) अन्य अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मंत्री संजय बनसोडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेल्या अधिकारी आणि त्यांना सहकार्य करण्या अधिकार्या विरुद्ध कारवाई करावी तसेच मधल्या मध्ये सरकारी कामात हस्तक्षेप करून दोषी अधिकाऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी क्रीडा प्रेमी मार्फत करण्यात येत आहे.
लवकरच सहकार्य करण्यारया सर्व अधिकार्याची पूर्वाया सह नाव स्पोर्ट्स पॅनोरमा सामोरी आणार आहे.