औरंगाबाद (प्रतिनिधी): येथील निलंबित जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांचा पदभार पैठण येथील तालुका क्रीडा अधिकारी शरद कचरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे
कचरे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात याआधीच कुस्ती प्रशिक्षक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे.शिवाय ते नामवंत आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कोच आहेत.”हिंदकेसरी (औरंगाबाद) महाराष्ट्र केसरीसह विविध राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी पंच म्हणून काम केलेले आहे.
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अधिपत्याखाली नावंदे यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश २४ जूनरोजी निर्गमित करण्यात आले होते.
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी केलेल्या सुचनेनुसार कुचरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
नावंदे यांनी वादग्रस्त निर्णय घेत, मनमानी कारभार करत व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदानासाठी वाटप निधीत अनियमितता केल्याचे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशीत आढळून आले आहे.