प्रतिनिधी (छत्रपती संभाजीनगर): जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक संघटना यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे बालेवाडी येथे १३ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स जागतिक वयोगट स्पर्धा आणि २९ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप पुणे येथे ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिकच्या खुल्या निवड चाचणी नुकतीच पार पडली. या निवड चाचणी करिता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता
या तीनही खेळाडूंचे १३ व्या FIG ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स जागतिक वयोगट स्पर्धा या स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.यात प्रांजल मिठुलाल जोनवाल,सलोनी सुनील म्हस्के,रिद्धी सचिन जैस्वाल यांची कनिष्ठ महिला ग्रुप या प्रकर मध्ये निवड झाली आहे.
तसेच प्रविण रावण शिंदे यांची भारतीय संघामध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.या घवघवीत यश मिळाल्याबद्दल महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ.आदित्य जोशी सचिव डॉ.मकरंद जोशी,उपसंचालक भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग डॉ. मोनिका घुगे, क्रीडा उपसंचालक सबनीस, क्रीडा व युवक सेवा संचालनालय छत्रपती संभाजीनगर, मसांमचे राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड.संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ.रणजीत पवार सचिव हर्षल मोगरे, कोषाध्यक्ष डॉ.सागर कुलकर्णी, डॉ.विशाल देशपांडे, रोहित रोंघे, संदीप गायकवाड, राहुल तांदळे,भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभाग जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे, पिंकी डे यांनी प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या..