टोकियो जगातील सर्व क्रीडास्पर्धांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकचे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. जपानची राजधानी टोकियो येथे ही स्पर्धा सुरु झाली. कोरोनाचे सावट असल्या कारणाने यावेळी स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याच वेळी, स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात परंपरेनुसार सर्व देशांच्या खेळाडूंचे संचलन पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाने सहभाग नोंदवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक यामध्ये, १२७ खेळाडू ८४ मेडल इव्हेंट्समध्ये सहभागी होतील.. जगभरातील २०५ देशांमधील तब्बल अकरा हजार खेळाडू पदकांसाठी प्राणपणास लावतील. या वर्षी भारतीय संघाला कमीत कमी १० पदके मिळवण्याची आशा आहे.
भालाफेकपटू नीरज चोप्रा, तिरंदाजीपटू दीपिका कुमारी, कुस्तीपटू बजरंग पुनिया व विनेश फोगट यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. नेमबाजीत भारताला चार पदके मिळण्याची शक्यता आहे